करोनाचा ‘एक्सई’ नावाचा नवा विषाणू भारतात दाखल

देशात कोरोना विषाणूचा ‘एक्सई’ हा नवा व्हेरिएंट बुधवारी मुंबईत सापडला, नव्या व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्या रुग्णात कुठलेही गंभीर लक्षण आढळले नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अद्याप देशात एक्सई व्हेरिएंट आ ढळल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.एक्सई व्हेरिएंटचा पहिला रुग्ण या वर्षी १९ जानेवारीला ब्रिटनमध्ये आढळला होता. त्यानंतर थायलंड आणि न्यूझीलंडमध्येही त्याचे रुग्ण आढळले. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, एक्सई व्हेरिएंट हा ओमायक्रॉनच्या बीए.१ आणि बीए.२ हे दोन स्ट्रेन्स मिळून तयार झाला आहे. त्याचा ओमायक्रॉनच्या तुलनेत १०% जास्त संसर्ग होऊ शकतो.पुण्याच्या नायडू रुग्णालयातील एकमेव कोरोना रुग्ण बरा होऊन घरी परतल्याने शहरातील शासकीय आणि खासगी रुग्णालयात आता एकही कोरोना रुग्ण नाही. जे ९८ रुग्ण सक्रिय आहेत ते सर्व गृह विलगीकरणातील आहेत, अशी माहिती महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी दिली. नायडू रुग्णालयातील शेवटच्या रुग्णाला बुधवारी डिस्चार्ज मिळाला पण मुंबईत एक्सई या करोंना विषाणूचा उपप्रकार सापडल्याच आरोग्य विभागाने जाहीर केले आहे. २३० रुग्णांच्या जनुकीय चाचण्या करण्यात आल्या त्यापैकी २२८ रुग्णांना ओमायकॉर्नची लागण झाली तर दोन रुग्णांना एक्सई आणि कप्पा या दोन विषाणूची लागण झाली मुंबईत ५० वर्षीय महिलेला एक्सईची बाधा झाल्याच प्राथमिक तपासणीत लक्षात आल. ही महिला दक्षिण आफ्रिकेची नागरिक आहे. ती १० फेब्रुवारीला शूटिंगसाठी आली होती, त्यावेळी तिला करोनाची बाधा झालेली नव्हती पण दोन मार्चला झालेल्या नियमित चाचणीत तिला एक्सई या करोंना विषाणूची लागण झाल्याच दिसून आल.डब्ल्यूएचओच्या रिपोर्ट नुसार हा नवा XE वैरिएंट ‘हाइब्रिड वैरिएंट’ आहे असं म्हटल जात आहे. यापूर्वी ही डेल्टा आणि ओमीकॉर्न यांच्या संयोजनाने तयार झालेला डेल्टाक्रॉन हा विषाणू मोठ्याप्रमाणावर घातक असल्याच सांगण्यात आल आहे. करोंनाच्या नव्या एक्सई या विषाणूच्या लक्षणाविषयी सांगायच झाल तर काही रुग्णांत त्याची सौम्य लक्षणे दिसू शकतात, तर काही रुग्णांत गंभीरही लक्षणे असू शकतात. ज्यांनी लस घेतली आहे अशा रुग्णांत त्याची सौम्य लक्षणे दिसू शकतात, तर ज्यांनी लस घेतली नाही अशा रुग्णांत गंभीर लक्षणे दिसू शकतात. एक्सई व्हेरिएंटच्या लक्षणांत ताप, घशात खवखव होणे, खोकला आणि सर्दी, त्वचेत जळजळ, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल डिसीइज यांचा समावेश आहे.

https://fb.watch/cezot_E4F1/

 

Share