मोटरसायकल अपघातात दोन मित्रांचा जागीच मृत्यू

माधव पिटले/निलंगा : तालुक्यातील गुंजरगा येथील दोन मित्र बुधवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास गुंजारगा निलंगाहुन गावाकडे मोटरसायकलवर निघाले असता ज्ञानोबा बोधले यांच्या शेताच्या आसपास अज्ञात वाहनाने या दोन मोटर सायकलस्वारांना धडक देवून पळून गेला. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. बालाजी राम शिंदे वय २७ व सूर्यकांत वाघंबर शिंदे वय ३८. असे मृत पावलेल्यांची नावे आहेत.

ही वार्ता निलंगा पोलीस स्टेशनला कळताच पोलीस निरीक्षक बि.आर.शेजाळ व पोलिस कर्मचाऱ्यांनी दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले. निलंगा पोलिसात अज्ञात वाहनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत बालाजी शिंदे यांच्या पश्चात पत्नी, आई , दोन मुली तर सूर्यकांत शिंदे यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे.

Share