यंदा जम्मू काश्मीरपासून महाराष्ट्रापर्यंत उष्णतेची लाट येणार

एप्रिल महिना सुरू झाला आहे तापमानात दिवसेंदिवस वाढ होतीये लवकरच जम्मू-काश्मीरपासून उत्तरेकडील सर्व राज्ये आणि मध्य भारतापासून ते महाराष्ट्रापर्यंत सध्या उष्णतेची लाट येण्याची स्थिती आहे. विदर्भात ९ ते ११ एप्रिल दरम्यान पुन्हा एकदा उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विशिष्ट वातावरणीय स्थितीमध्ये उष्णतेची लाट निर्माण होणे ही सर्वसाधारण घटना असली तरीही अलीकडच्या काळात या लाटांचे प्रमाण आणि तीव्रता जास्त आहे.

या लाटेच्या निर्मिती विषयी सांगायच झाल तर वायव्य भारतात प्रतिचक्रवात स्थिती निर्माण झाल्याने जमिनीलगतची हवा वर जाऊ शकत नाही. उन्हाळ्यात आकाश स्वच्छ असल्याने सूर्यकिरणे थेट जमिनीवर पडून हवा तापते. या स्थितीचा परिणाम देशाच्या विविध भागांवर होतो. वायव्य भारतातून येणाऱ्या कोरड्या आणि गरम वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातही विविध ठिकाणी उष्णतेची लाट निर्माण होते. या लाटेमुळे मुंबईसारख्या समुद्र किनारी शहरातील कमाल तापमान ३७ अंशांच्या वर जावू शकत तर जम्मू काश्मीरमध्ये तापमान ३० अंश आणि मैदानी प्रदेशात तापमान ४० अंशांच्यावर जाऊ शकत. जेव्हा तीव्र उष्णतेची लाट येते तेव्हा कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत ४.५ ते ६.४ अंशांपर्यंत किंवा त्यापेक्षा अधिक वाढते.ही स्थिती दोन दिवस कायम राहिली तर हवामान विभागातर्फे उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला जातो.

जागतिक तापमानवाढीमुळे साल २००० नंतर उष्णतेच्या लाटांचे प्रमाण आणि तीव्रता वाढली. त्यापूर्वी एखादी दुसरी लाट यांची पण आता या लाटा येण्याच प्रमाण वाढल आहे. या लाटेचा प्रभाव २ ते ३ राहणे अपेक्षित असत पण लाटेची तीव्रता जास्त असेल तर या लाटेचा प्रभाव सात दिवसही राहतो. १९८१ आणि १९८७ साली ही मुंबईत ही लाट मार्च महिन्यात आली होती. त्यानंतर १९ मार्च २०१६ला जेव्हा ही लाट राजस्थानमध्ये आली तेव्हा सर्वाधिक कमाल तापमान ५१ अंश नोंदवण्यात आल होत.

तापमान वाढ म्हटल तर या लाटेचा परिणाम मानवी हा होणारच या अति उष्ण तपमानामुळे डोकेदुखी, उलट्या, ताप येऊन उष्माघात होऊ शकतो तसेच, अति तपमानामुळे शरीर निर्जलीकरणाचाही त्रास जाणवू शकतो. २०१५ साली आलेल्या उष्णतेच्या लाटेचा सर्वाधिक प्रभाव जाणवला होता. त्यावेळी  देशभरात २ हजार ५०० नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे शक्यतो दुपारी १२ ते ३ घराबाहेर पडू नका, बाहेर फिरताना डोके कापडाने झाका आणि भरपूर पाणी प्या.

 

Share