एसटी कर्मचाऱ्यांचा संताप शरद पवारांच्या बंगल्यावर हल्ला

मुंबई : एसटीच्या विलीनीकरणासाठी गेल्या पाच – सहा महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या संतप्त एसटी कर्मचाऱ्यांच्या एका जमावाने आज  दुपारी तीन वाजता अचानक शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावर हल्ला केला. यात काहींनी बंगल्याच्या दिशेने चपला भिरकावल्या तर, काहींनी दगडफेक केली तर काहीनी  ‘वंदे मातरम्’ अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या.

याघटनेने  सर्वच जण अवाक झाले राष्ट्रवादीच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी तत्काळ घराकडे धाव घेत आंदोलकांशी समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण आंदोलकांनी त्यांच्यावरही धावून जाण्याचा प्रयत्न केल्याने स्थिती अधिकच चिघळली. आंदोलकानी आमची परिस्थिती जाणून घ्या आमचे कष्ट बघा अस म्हणत टाहो फोडला आणि आमच्या कष्टाला मोबदला मिळाला पाहिजे,आमचे सहकारी आम्ही गमावले या सर्व एसटी कर्मचाऱ्यांच्या मृत्यूला शरद पवार व महाविकास आघाडी जबाबदार आहे.

त्यांनी अद्यापही न्याय दिला नाही, अशा संतप्त भावना आंदोलकांनी केल्या आहेत. सुप्रियांनी आंदोलकांशी संवाद साधण्याचाही प्रयत्न केला, या घटनेनंतर सुप्रिया सुळे यांनी ही घटना दुर्दैवी आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच त्यांनी अशी  घटना पहिली अशी भावना व्यक्त केली, या प्रश्नावर शांततेच्या मार्गाने उपाय काढला पाहिजे असही त्यांनी म्हटल.

 

Share