टँकरला पाणी पुरवठा करण्याऱ्या जळकुंभावर सीसीटीव्ही, व्हिटीएस सिस्टम बसवण्यात येणार आहे. अवैध पाणी विक्री रोखण्यासाठी ही उपाययोजना करण्यात येणार आहे. पाणीपुरवठ्यात येणाऱ्या अडचणीवर मार्ग काढण्यासाठी आस्तिककुमार पांडे यांनी उपअभियंत्यांकडे झोननिहाय नियंत्रण अधिकारी म्हणून जबाबदारी सोपवली आहे. लाइनमॅनलाही पाणी पुरवठा करणाऱ्या भागातल्या नागरिकांची स्वाक्षरी घेण्याची सक्ती करण्यात आलीये. या कॅमेऱ्याचे मॉनिटेरीनग औरंगाबाद स्मार्ट सिटीच्या इंटीग्रेटेड कमांड आणि कंट्रोल सेंटर येथे करण्यात येईल.
टँकरवरील व्हीटीएस म्हणजेच व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टममुळे टँकरवर सतत नजर ठेवणे सहज शक्य होईल.त्याचबरोबर पाण्याच्या टाकीच्या एंट्री आणि एक्जिट गेट वर बूम बॅरीअर बसवण्यात येणार आहेत.प्रत्येक टँकरकडे एक क्युआर कोड असेल तो स्कॅन केल्यानंतरच टँकरला आता येण्याची परवानगी मिळेल.स्मार्ट सिटीचे सीईओ आस्तिककुमार पांडे यांनी पाणीपुरवठा विभागाची बैठक घेऊन. अवैध पाणी विक्री रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात असे आदेश दिले आहेत.
सिडको हडकोसह शहरातील बऱ्याच भागात पाणी येत नाही. पण पाणीपुरवठा विभागाला याच्याशी काहीच देणे घेणे नाही. याउलट मनपाच्या पाण्यावर अवैध पाणी विक्री करून दररोज हजारो रुपये कमवण्याचा उद्योग सुरू झाला आहे.
२०१२ पर्यंत महानगरपालिकेकडे १२ लहान मोठे टँकर होते. ज्या वसहतीमध्ये पाणी आले नाही तिथे मनपाचे टँकर मोफत जात होते. त्यानंतर समांतर वाहिनीचे काम करणारी युटिलीटी कंपनी आली. मनपाने हे सगळे टँकर या कंपनीला फुकट दिले. आता मनपा कडे ४ टँकर आहेत. सध्या कंत्राटदारांचे ८० टँकर चालतात, हे टँकर दिवसभरात ६०० फेऱ्या करतात. एका फेरीत २०० लीटर पाण्याची चोरी होते यानुसार दिवसभरात लाख लीटर पाणी चोरीला जात असेल असा अंदाज आहे.
या परिस्थितीला पाणीपुरवठा विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमधील असमन्वय जबाबदार आहे. कोणत्या वसाहतीला किती वेळ पाणी द्यायच याच वेळापत्रकच ठरलेल नाहीये. लाइनमनच्या मनात येईल तेव्हा पाणीपुरवठा करण्यात येतो. कोण टँकर भरून नेत आहेत यांची साधी तपासणी वारिष्ट अधिकऱ्यांकडून केली जात नाही. या परिस्थितीला पूर्वपदावर आणण्यासाठी मनपा प्रशासनाने आता ठोस उपाय योजना करायला सुरुवात केली आहे. त्यानुसार आता शहराला चार भागात विभागण्यात आल आहे. प्रत्येक विभागाची जबाबदारी उपअभियंत्यावर सोपवण्यात आलीये. ज्याभागात पाणी पुरवठा करण्यात तिथल्या नागरिकांच्या सह्या नोंदवहीत नोंद करून ठेवण्यात येणार आहेत. मनपा प्रशासकाकडून त्याची तपासणीही करण्यात येणार आहे.