दिल्ली : देशभरात पेट्रोल, डिझेल आणि इतर खाद्यपदार्थांच्या किमतीत सातत्याने वाढ होत असताना, पुन्हा एकदा पीएनजी आणि सीएनजीच्या वाढत्या किमतींनी नागरिक त्रस्त झाले आहेत. राजधानी दिल्लीत १२ तासांच्या आत पीएनजीच्या किमतीत वाढ झाल्यानंतर आता सीएनजीच्या दरातही २.५ रुपये प्रति किलोने वाढ झाली आहे. या वाढीमुळे दिल्लीत सीएनजीची किंमत ७१.६१ रुपये प्रति किलो झाली आहे.
आज दिल्लीत सीएनजीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. २.५० रुपयांच्या वाढीसह आता NCRमध्ये सीएनजीची किंमत ७१.६१ रुपयांवर पोहोचली आहे. तर हरियाणामध्ये यासाठी ८० रुपये मोजावे लागतील. तर नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादमध्ये १ किलो CNG ची किंमत ७४.१७ वर पोहोचली आहे. दिल्लीत पीएनजीच्या किमती पुन्हा वाढवण्यात आल्या आहेत. पीएनजीच्या किमतीत ४.२५ रुपये प्रति एससीएमने वाढ झाल्याने त्याची किंमत ४५.८६ रुपये एससीएम झाली. दिलासा म्हणजे आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही.