काश्मिरमध्ये भारतीय जवानांकडून दोन दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर : दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील जैनापोरा भागातील बडीगाममध्ये गुरुवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले आहे. ठार झालेल्या दहशतवाद्यांची अद्याप ओळख पटलेली नाही.

दुसरीकडे चकमक स्थळाजवळ सुमो पलटी झाल्याने दोन जवानांना प्राण गमवावे लागले, तर दोन जण जखमी झाले आहेत. सुमो 44 आरआर चौगाम कॅम्पमधून सैन्यासह बडीगाम येथे चकमकीच्या ठिकाणी जात होते. त्यावेळी वाटेत चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने सुमो पलटी झाली. यात दोन जवानांचा मृत्यू झाला तर, दोघेजण जखमी झाले आहेत. जखमी जवानांना शोपियांच्या जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी तीन दहशतवादी असल्याची प्राथमिक माहिती असून, दोघा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश मिळाले आहे. तर, तिसऱ्या दहशतवाद्याचा शोध घेतला जात आहे.

Share