उत्तराखंड : बिगर हिंदूंना चारधाम यात्रेत परवानगी दिली जाऊ नये, अशी मागणी साधू – संतांकडून अनेक दिवसांपासून केली जात होती. त्यामुळे उत्तराखंड सरकारने हा निर्णय घेतला आहे. यापुढे चारधाम यात्रेसाठी येणाऱ्या यात्रेकरूंची पडताळणी केली जाईल, अशी माहिती उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी दिली आहे.
धामी म्हणाले, आमच्या राज्यात शांतता नांदली पाहिजे. राज्याचा धर्म आणि संस्कृती सुरक्षित राहिली पाहिजे. यासाठी प्रशासनाने भाविकांची पूर्णत: पडताळणी करणे आवश्यक आहे. ज्यांच्यामुळे अस्थिरता निर्माण होऊ शकते, ते राज्यात येऊ नयेत. हरिद्वार येथील शांभवी धामचे प्रमुख स्वामी आनंद स्वरूप यांनी सरकारकडे नुकतीच भूमी कायद्यात सुधारणा करण्याची मागणी केली होती. यामुळे चारधाम क्षेत्रात बिगर हिंदू जमिनीचे मालक बनणार नाहीत.