टेस्लाचे सीइओ एलोन मास्क आता ट्वीटरचे नवे मालक

एलोन मस्क आता ट्वीटरचे नवीन मालक बनले आहेत.काल दिवसभर याविषयी चर्चा सुरू होती त्यामुळे ट्वीटरच्या शेयर्समध्ये सहा टक्क्यांनी वाढ झाली.

ट्वीटर ही मायक्रो ब्लॉगिंग साइट खरेदी करण्यासाठी मस्क यांनी ४४  अब्ज डॉलर्स म्हणजेच ३३६८  अब्ज रुपयांचा करार केला आहे. ट्विटरच्या स्वतंत्र बोर्डाचे अध्यक्ष ब्रेट टेलर यांनी भारतीय प्रमाणवेळेनुसार सोमवारी मध्यरात्री १२.२४  वाजता एका प्रसिद्धिपत्रकात मस्क यांच्यासोबत झालेल्या कराराची माहिती दिली.

मस्क यांना ट्विटरच्या प्रत्येक शेअरसाठी ५४.२० डॉलर ४१४८ द्यावे लागतील. ट्विटरमध्ये त्यांची आधीपासून ९ % भागीदारी होती आता करारानंतर या कंपनीमध्ये त्यांची 100 % भागीदारी असेल

ट्विटर विकत घेण्याचा करार निश्चित होण्यापूर्वीच एलन मस्क ९.२ % स्टेकसह ट्विटरचे सर्वात मोठे शेअरहोल्डर होते. त्यांच्या खालोखाल व्हॅनगार्ड ग्रुपचा क्रमांक लागतो, ज्याची ८.८ % मालकी आहे. आता मस्क यांची ट्विटरवर १०० % मालकी असलेली ही त्यांची खासगी कंपनी असेल.

 

Share