साक्षी सांगते, रिअल लाइफमध्ये आई होणे रील लाइफमधील आई होण्यापेक्षा खूप कठीण आहे. एखाद्या प्रोजेक्टमध्ये आईची भूमिका करते तर त्यात पुढील दृश्यात काय करायचं हे माहीत असते, मात्र खऱ्या आयुष्यात तुम्ही कितीही तयारी करा, तुम्हाला तुमचे बाळ फिरवून टाकतो. आपल्या बाळाला आपण समजून घेतले, असे जेव्हा तुम्हाला वाटते तेव्हा अचानक सर्व बदलते. खऱ्या आयुष्यात माझ्यासोबतच असेच होत आहे. आई झाल्यानंतर माझे आयुष्य खूप बदलले आहे. आता मी माझा प्रत्येक निर्णय मुलीला लक्षात ठेवून घेते. जेव्हा चित्रीकरण करते तेव्हाही तिचाच विचार करते. मातृत्वाने मला नक्कीच बदलून टाकले आहे.
सिरिज ऑफर झाल्यावर प्रतिक्रिया होती, मी यात फिट होणार नाही…
निर्माते माझ्याकडे याची पटकथा घेऊन आले तेव्हा माझी पहिली प्रतिक्रिया होती, मी या भूमिकेसाठी फिट नाही. माझा माझ्यावर बिलकुल विश्वास नव्हता की, मी या प्रकारच्या भूमिका करू शकते. मात्र, कथा खूप चांगली वाटली. तसेच भीतीही होती की मी या इटेन्स रोलला न्याय देऊ शकेल का? मी काहीसे घाबरली होती. जेव्हा मी माझे हे म्हणणे निर्मात्यांना सांगितले तेव्हा त्यांनी मला आश्वासन दिले की, ते माझी सर्व मदत करतील. नंतर अनेक वर्कशॉपमध्ये गेले तर माझ्यात या भूमिकेसाठी आत्मविश्वास आला.
कम्फर्ट झोनमध्ये राहून काम करणे आवडत नाही
मला कम्फर्ट झोनमध्ये राहून काम करणे आवडत नाही. जोपर्यंत एखादा आव्हानात्मक भूमिका मिळत नाही, त्या प्रोजेक्टमध्ये पुढे जाण्यात भीती असते. येत्या काळातही अशा प्रोजेक्टचा भाग होऊ इच्छिते, ज्यात स्वत:ला चमकवू शकेल. ‘माई’ ही खूप आव्हानात्मक आहे. मी यासाठी खूप तयारी केली. मग पडद्यावर टीमचे परीश्रम पाहिल्यावर समाधान वाटले.