लाल महालात लावणीप्रकरणी; वैष्णवी पाटीलचा जाहीर माफीनामा

पुणे : सध्या रिल्स तयार करण्याचा प्रकार चांगलाच वाढला आहे. कोणीही रिल्स तयार करून शेअर करीत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. मात्र, रिल्स तयार करण्यासाठी पुण्यातील ऐतिहासिक लाल महालमध्ये चक्क लावणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावर आता वैष्णवी पाटीलने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून या प्रकरणी जाहीर माफी मागितली आहे.

वैष्णवी पाटील म्हणाली, काही दिवसांपूर्वी मी पुण्यातील सर्वश्रष्ठ जिजाऊंच्या लाल महालात चंद्रा लावणीवर डान्स व्हिडीओ केला होता. तो व्हिडीओ करताना त्यावर वाद होईल असं काहीच माझ्या मनीध्यानी आलं नव्हतं. मी एक डान्सर म्हणून तो व्हिडीओ बनवायला गेले होते. कुणाचंही मन दुखावण्याचा, शिवप्रेमींचं मन दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. मी स्वतः एक शिवप्रेमी आहे. परंतू ही चुकी माझ्याकडून झाली हे मला कळलं.

https://www.instagram.com/tv/CdyTF-eD5T6/?utm_source=ig_web_copy_link

ज्या क्षणी मला माझ्याकडून चूक झाली हे कळलं त्याक्षणी मी तो व्हिडीओ डिलीट केला होता. परंतू मी तो व्हिडीओ डिलीट करण्याआधीच माझ्या चाहत्यांनी तो व्हिडीओ व्हायरल केला. मी सर्वांना तर सांगू शकत नाही, पण मी माझ्या सोशल मीडिया अकाऊंटवरून तो व्हिडीओ डिलीट केला. आत्ताही मी माझ्या चाहत्यांना व्यक्तिगतपणे तो व्हिडीओ डिलीट करण्यास सांगत आहे,अशी माहिती वैष्णवी पाटीलने दिली.

माझ्याकडून लालमहालात लावणी व्हिडीओ शूट करण्याची चूक झाली आहे. माझ्या मनात काहीच नव्हतं. मी जाणूनबुजून केलं असंही नाही. असा विचार मी माझ्या स्वप्नातही करू शकत नाही. गाणं चांगलं होतं म्हणून मी तो व्हिडीओ केला. परंतू ही चुकी माझ्याकडून झाली. ही चूक मी मान्य करते. सर्व शिवप्रेमी आणि माझ्या चाहत्यांची मी माफी मागते. तसेच जिजाऊ माँ साहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अस्मितेला धक्का बसेल असा माझा हेतू नव्हता, असंही वैष्णवी पाटीलने नमूद केलं.

Share