गदाधारी,भेसळयुक्त हिंदुत्ववाल्यांची बांग बंद होणार

मुंबई : मशिदीवरील भोंग्याचा मुद्दा उचलून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सभांचा धडाका लावला आहे. मुंबई, ठाणे,  औरंगाबादपाठोपाठ आता पुण्यात सभा होणार आहे. राज ठाकरे यांची उद्या सकाळी १० वाजता पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत राज ठाकरे अयोध्या दौरा अचानक स्थगित का केला, याविषयी कारण स्पष्ट करतील. राज ठाकरे यांनी मनसैनिकांना या सभेला येण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे राज ठाकरे या सभेत काय बोलणार, कोणावर तोफ डागणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सभेपूर्वी मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी ट्विट करत इशारा दिला आहे. गदाधारी, भेसळयुक्त हिंदुत्ववाल्यांची बांग बंद होणार, तर बेगडी धर्मनिरपेक्षता वाल्यांचे बुरखे फाटणार… ज्वलंत आणि जाज्वल्य हिंदुत्वाची गर्जना होणार.., असं गजानन काळे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे पुण्यातील सभेत राज ठाकरे नेमकं कोणावर निशाणा साधणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Share