कॉंग्रेसला सोडचिठ्ठी ; भाजपमध्ये ‘हार्दिक’ स्वागत

नवी दिल्ली : गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षातून आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तेव्हापासून ते कोणत्याही क्षणी भाजपात प्रवेश करू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. आता खुद्द हार्दिक पटेल यांनीच या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

हार्दिक पटेल येत्या गुरुवारी म्हणजे २ जून रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना यासंदर्भातील माहिती दिली. यापूर्वी त्यांनी आपली नाराजी व्यक्त करत काँग्रेसला रामराम ठोकला होता. त्यानंतर काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागलं होतं. ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील अशा चर्चाही राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या.

दरम्यान गुजरात विधानसभा निवडणुकीला अवघा महिना बाकी असतानाच हार्दिक पटेल यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. मला काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष बनवलं पण कोणतीच जबाबदारी दिली नाही. मला सातत्याने डावललं गेलं मी काँग्रेस सोडावी असंच राज्यातील नेतृत्वाला वाटत आहे, असा आरोप त्यांनी केला होता. राज्यात काँग्रेस अत्यंत कमकुवत आहे. तसेच काँग्रेस जिंकेल अशी स्थिती नाहीये, असे सांगत त्यांनी राजीनामा दिला तसेच राज्यातील नेतृत्व तरुणांना संधीच देत नसल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.

Share