मुंबई : राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांच्याविरोधात चेंबुर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेंबुरमध्ये राहणारे व्यावसायिक ललितकूमार टेकचंदानी यांच्या तक्रारीनंतर भुजबळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छगन भुजबळ यांच्यासह अन्य दोघांविरोधात धमकी दिल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारतीय दंड संहितेच्या कलम ५०६ (२) (धमकी देणे) आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टेकचंदानी यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, त्यांनी छगन भुजबळ यांना त्यांच्या मोबाईलवर दोन व्हिडिओ पाठवले होते. ज्यात भुजबळांनी हिंदू धर्माचा अपमान करणारे भाषण केले होते. व्हिडिओ पाठवल्यानंतर लगेचच टेकचंदानी यांना धमक्या देणारे व्हॉट्सअॅप कॉल्स आणि मेसेज येऊ लागले. ज्यात त्यांना शिवीगाळ सुद्धा घेण्यात आली आहे.
Maharashtra | NCP leader Chhagan Bhujbal & 2 others booked under IPC sec 506 after a Chembur resident gave complaint at the Chembur police station alleging Bhujbal & others threatened to kill him for forwarding 2 videos to Bhujbal in which he was speaking against Hindu religion
— ANI (@ANI) October 1, 2022
‘तू भुजबळ साहेबांना संदेश पाठवतो, तुझा घरी येऊन गोळ्या टाकतो. मी दुबईची लोकं लावतो, भुजबळ साहेबांना मेसेज करणं महागात पडेल’, अशा शब्दात टेकचंदानी यांना धमक्या देण्यात आल्या असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.
दरम्यान, टेकचंदानी यांना हे संदेश आणि कॉल कुणी केले यांचा पोलीस तपास करत आहे. टेकचंदानी यांनी त्याला आलेल्या मोबाईल नंबरची माहिती पोलिसांना दिली असून पोलीस पुढील तपास करत आहे.
राहुल शेवाळे यांच्या ट्वीटची चर्चा
खासदार राहुल शेवाळे यांनी या प्रकरणी ट्वीट करत म्हणाले कि, चेंबूरचे व्यापारी ललित टेकचंदानी यांना दिलेल्या धमकीमागे कोण आहे? या धमकीला माजी मंत्र्यांचे समर्थन आहे काय?अखेर ही धमकी कुणाच्या इशाऱ्यावर दिली गेली? या सर्व प्रश्नांची उत्तरे जनतेसमोर यायला हवीत. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, असं खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटलं आहे.