भेडिया चित्रपटाचा टीझर रिलीज

वरुण धवन आणि क्रिती सेनन यांच्या ‘भेडिया’ चित्रपटाचे व्हिज्युअल पोस्टर समोर आल्यापासून प्रेक्षकांमध्ये हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता खूप वाढली आहे. या चित्रपटाबाबत बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. अशा परिस्थितीत चित्रपटाच्या टीझरने लोकांची उत्कंठा द्विगुणित केली आहे. अमर कौशिक दिग्दर्शित ‘भेडिया’ चित्रपटाचा ट्रेलर १९ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे . तर चित्रपट २५  नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

Bhediya Teaser Out | वरुण धवनच्या 'भेडिया'चा टीझर रिलीज, या दिवशी रिलीज  होणार चित्रपटाचा ट्रेलर | Navarashtra (नवराष्ट्र)

यापूर्वी चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाल्यापासून लोक त्याच्या ट्रेलरची वाट पाहत होते. आता प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली आहे. याचा ट्रेलर १९ ऑक्टोबरला रिलीज होणार असल्याचे मेकर्सनी सांगितले. त्याचवेळी भेडियाचा टीझर पाहून तुमच्याही अंगावर शहारे येतील. वास्तविक, टीझरमध्ये, भेडियाची कहाणी भितीदायक आवाजात रॅप करून सांगितली आहे, भेडिया आपल्या पापी पोटासाठी माणसांना कसा खातो.

गडद आणि जोरदार रॅपने सुरू होणारा हा टीझर तुम्हाला हादरवून सोडेल. एका मिनिटाच्या टीझरमध्ये एक जंगली रहस्य दडलेले दिसत आहे. टीझर व्हिडिओमध्ये वरुण रात्री जंगलाच्या मध्यभागी धावताना दिसत आहे. तर दुसरीकडे गावातील काही लोक प्राणी जाळताना दिसत आहेत. आगीत लांडग्याचा आकार दिसतो. या चित्रपटात क्रिती सेनॉन देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे, परंतु टीझरमध्ये तिची अनुपस्थिती थोडी गोंधळलेली आहे. टीझर पाहिल्यानंतर आता बॉलीवूडची कथा केवळ रोमान्सपुरती मर्यादित राहिलेली नाही, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. चित्रपट आता उत्तम VFX आणि स्टोरी लाइन्सने बनवले जातात. भेडिया हा पहिला भारतीय क्रिएचर कॉमेडी चित्रपट आहे

Share