बारामती ॲग्रोची केस स्टडी करतोय; मोहित कंबोज यांचे नवं टि्वट

मुंबई : राष्ट्रवादीचे दोन बडे नेते सध्या तुरूंगात आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यानंतर राष्ट्रवादीचा आणखी एक बडा नेता अडचणीत येणार अडचणीत येणार असल्याचं मोहित कंबोज यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आज त्यांनी राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधलाय.

मोहित कंबोज आपल्या ट्विट म्हणतात, बारामती अॅग्रो लिमिटेड स्टार्ट अपसाठी केस स्टडी आहे. मी वैयक्तिकरित्या या कंपनीच्या उपलब्धींचा अभ्यास करण्यास सुरुवात केली आहे. यामागची यशोगाथा समजून घेण्यास तरुणांना मदत करणारा संक्षिप्त अभ्यास लवकरच शेअर करणार आहे, असे ट्विट मोहित कंबोज यांनी केले आहे.

दरम्यान यावर आमदार रोहित पवार मोहित कंबोज यांना प्रत्युत्तर दिले आहे. जेव्हा त्याने ट्विट केले तेव्हाच मी कंबोज यांची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यांने ५२ कोटी रुपये ओव्हरसिज बँकेत घोटाळ्याचा विषय आहे. अजून दोन तीन बँकांना चुना लावला आहे. ज्यांने सामान्य लोकांचा जिथे पैसा असतो, त्या बँकेला चुना लावला असेल त्या व्यक्तीच्या ट्विटला किती महत्व द्यावे हे समजून घ्यावे, असे प्रत्यूत्तर पवारांनी दिले आहे.

Share