ज्येष्ठांना डावलून ‘मर्सिडीज बॉय’ला मंत्रिपद दिलं; चित्रा वाघ यांचा ठाकरे पिता-पुत्राला टोला

मुंबई : शिवसेनेतील ज्येष्ठांना डावलून मर्सिडीज बॅाय’ला मंत्री केलं आणि वडील स्वतः मुख्यमंत्री बनले.पुत्रप्रेम संपत नव्हतं अन् सत्तेची खुर्ची सुटत नव्हती.शेवटी पक्षातच महाभारत घडलं, अशी जहरी टीका भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्वव ठाकरे यांच्यावर केली आहे.

चित्रा वाघ आपल्या ट्विट मध्ये म्हणतात, पुत्रप्रेमात आंधळा झालेला धृतराष्ट्र कोण आहे हे महाराष्ट्राच्या जनतेनं मागील अडीच वर्षात पाहिलंय..शिवसेनेतील ज्येष्ठांना डावलून मर्सिडीज बॅाय’ला मंत्री केलं आणि वडील स्वतः मुख्यमंत्री बनले.पुत्रप्रेम संपत नव्हतं अन् सत्तेची खुर्ची सुटत नव्हती.शेवटी पक्षातच महाभारत घडलं, असे वाघ यांनी म्हटलं आहे.

कित्येक घटना डोळ्यांसमोर आहेत…देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत वार करण्याची एकही संधी शिवसेनेतील कंसानं आजवर सोडली नाही. आता तर भ्याडपणे पुतणा मावशीला पुढे केलंय. अशा कितीही पुतणा मावशी अंगावर पाठवल्या तरी जनतेचा हा कृष्णरूपी देवेंद्र सर्वांना पुरून उरणार.. नुकतंच अर्ध्या हळकुंडानं पिवळे झालेल्यांनी हे लक्षात ठेवावं,” अशा शब्दात वाघ यांनी सुनावलं आहे.

Share