‘आरएसएस’ ची कार्यालये बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्याऱ्या आरोपीस तामिळनाडूत अटक

लखनौ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) उत्तर प्रदेशातील लखनऊ आणि कर्नाटकसह इतर ठिकाणी असलेली कार्यालये बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. राज मोहम्मद असे त्या व्यक्तीचे नाव आहे. तामिळनाडूतील पुडुकुडी येथून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

उत्तर प्रदेशातील लखनऊ आणि कर्नाटकसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सहा कार्यालये बॉम्बने उडवून देण्याची धमकी राज मोहम्मदने व्हॉटस्अ‍ॅपद्वारे दिली होती. मोहम्मदने एका विदेशी नंबरवरून लखनौ आणि उन्नावमधील नवाबगंज येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली होती. अलीगंज येथे राहणाऱ्या डॉ. नीळकंठ मणी पुजारी यांना व्हॉटस्अ‍ॅपवर हा मेसेज मोहम्मदने पाठवला होता. या धमकीनंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला होता.

उत्तर प्रदेश आणि कर्नाटकसह ६ ठिकाणची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची  (आरएसएस) कार्यालये बॉम्बद्वारे उडवून देण्याची धमकी मोहम्मदने दिली होती. हिंदी, इंग्रजी आणि कन्नड भाषेत मेसेज करून मोहम्मदने ही धमकी दिली होती. असे धमकीचे मेसेज पाठवणाऱ्या राज मोहम्मदला तामिळनाडू पोलिसांनी अखेर अटक केली असून, उत्तर प्रदेश पोलिस आता मोहम्मदला आपल्या ताब्यात घेण्याच्या तयारीत आहेत.

Share