मुंबई : मनी लाँड्रिंग प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस हिच्यावर मोठी कारवाई केली आहे. तिची सात कोटी रुपयांची मालमत्ता ‘ईडी’ ने जप्त केली आहे.
२०० कोटी रुपयांच्या हवाला प्रकरणाच्या चौकशीसाठी ‘ईडी’ ने जॅकलीन फर्नांडिस हिला गेल्या वर्षी समन्स बजावले हाेते. या प्रकरणात तिची चाैकशी झाली हाेती. मनी लाँड्रिंग प्रकरणात सुकेश चंद्रशेखर तसेच त्याच्या पत्नीसह सहा जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. हे आरोपपत्र तब्बल सात हजार पानी आहे. सुकेश चंद्रशेखर आणि जॅकलीनमध्ये पैशांची देवाणघेवाण झाल्याचे ‘ईडी’च्या चौकशीत आढळून आले आहे. या प्रकरणात जॅकलीनची चौकशी केली जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे सुकेश चंद्रशेखर याने अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस हिला ५२ लाख रुपयांचा घोडा आणि चार मांजरं भेट म्हणून दिली होती. या मांजरांची किंमत प्रत्येकी ९ लाख रुपये एवढी हाेती. तसेच त्याने महागडे दागिने आणि महागड्या भेटवस्तू जॅकलीनला दिल्या आहेत, असे आरोपपत्रात नमूद करण्यात आले हाेते.
https://twitter.com/ANI/status/1520312256696705024?s=20&t=7kCDeo6oSO1FzSkwAwfeqw