मुंबई : वेदांत- फाॅक्सकाॅन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यामुळे राज्यातलं राजकारण तापलं आहे. याच दरम्यान आता भाजपचे नेते आशिष शेलार यांनी शिवसेना नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. शेलार यांनी एक पत्रक प्रसिद्ध करत आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी केली आहे.
ठाकरे सरकारच्या अडिच वर्षांच्या काळात वेदांत -फॉक्सकॉन कंपनीला ना जमीन दिली ना, कुठला करार केला. असे सांगत शेलार यांनी पुरावा ट्विट केला आहे. प्रकल्प महाराष्ट्रात तुम्ही आणलाच नाही आणि गेला म्हणून ओरडता? अडिच वर्षे कंपनीला का लटकवले? टक्केवारीसाठी वाटाघाटी सुरु होत्या का? असा सवाल करत शेलार यांनी चौकशीची मागणी केली आहे.
ठाकरे सरकारच्या अडिच वर्षांच्या काळात वेदांत -फॉक्सकॉन कंपनीला ना जमीन दिली ना, कुठला करार केला…हा घ्या सरकारी पुरावा
प्रकल्प महाराष्ट्रात तुम्ही आणलाच नाही आणि गेला म्हणून ओरडता?
अडिच वर्षे कंपनीला का लटकवले?
टक्केवारीसाठी वाटाघाटी सुरु होत्या का?
चौकशी झालीच पाहिजे!
1/2 pic.twitter.com/aMXYhVPxqJ— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 27, 2022
दरम्यान, या प्रकरणी खोटे बोलून मराठी तरुणांची माथी भडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी असेही शेलार यांनी म्हटलं आहे. तसेच, चौकशीला समोरे जा…अजून बरेच निघेल!अन्यथा तरुणांची माथी भडकवणे, दोन समाजात तेढ निर्माण करणे या प्रकरणी कायदेशीर कारवाई सरकारने का करु नये? असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे.