आदित्य ठाकरे यांचं ठरलं! ‘या’ तारखेला अयोध्येला जाणार

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापाठोपाठ शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे १० जूनला अयोध्या दौरा करणार आहेत, अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली.

खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरुन टीका केली आहे. अयोध्येमध्ये नकली भावनेतून जाणाऱ्या रामलल्लाचा आशीर्वाद मिळत नाही, त्यांना विरोध होणार, असे राऊत म्हणाले. प्रभू श्रीराम देशातील सर्वांचे आहेत. अयोध्येत किंवा उत्तर प्रदेशात असली नकली बॅनर कुणी लावले माहिती नाही. उत्तर प्रदेशची जनता सुजाण आहे. आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी आमची तारीख १० जून ठरतेय, असे संजय राऊत म्हणाले. आदित्य टाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची तयारी सुरु असल्याची माहिती देखील संजय राऊत यांनी दिली आहे.

दरम्यान आदित्य ठाकरे  यांच्या दौऱ्याआधी अयोध्येत  शिवसेनेकडून पोस्टरबाजी करण्यात आली आहे. या पोस्टरबाजीतून शिवसेनेने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘असली येत आहे, नकली पासून सावधान’, अशा शब्दांमध्ये शिवसेनेने पोस्टरच्या माध्यमातून राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे

Share