‘असली आ रहा है, नकली से सावधान’;अयोध्येत शिवसेनेची मनसेविरोधात बॅनरबाजी

मुंबई : राज्यात सध्या अयोध्या दौऱ्यावरुन मनसे आणि शिवसेनेमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अयोध्ये दौऱ्याआधी शिवसेनेकडून अयोध्येत जोरदार पोस्टरबाजी करण्यात आली आहे. या पोस्टरबाजीतून शिवसेनेने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘असली येत आहे, नकली पासून सावधान’, अशा शब्दांमध्ये शिवसेनेने पोस्टरच्या माध्यमातून राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी मनसेने जोरदार तयारी केली आहे. मनसेकडूनही अयोध्येत राज ठाकरे यांच्या दौऱ्याचे पोस्टर लावण्यात आलं होतं. ‘राज’ तिलक की करो तैयारी आ रहे है भगवा धारी, चलो अयोध्या…’ असं या पोस्टर्सवर लिहिण्यात आलं होतं. अयोध्या दौऱ्यात मोठ्या प्रमाणात लोकांनी सहभागी व्हावं, यासाठी नियोजनात काटेकोरपणा आणला जात आहे. दौऱ्याच्या निमित्ताने मनसे अयोध्या आणि शरयू नदीकाठी शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे आणि राज्यातील इतर कानाकोपऱ्यातून मनसेचे कार्यकर्ते अयोध्येत दाखल होणार आहेत. यासाठी मनसेतर्फे सुमारे १० ते १२ रेल्वे गाड्यांची मागणी करण्यात आली आहे.

Share