आप पाठोपाठ शिवसेनेकडून उत्पल पर्रिकरांना ऑफर

पणजी- गोवा विधानसभा निवडणूकीच्या उमेदवारी जाहीर करण्यात आल्या यात मनोहर पर्रिकरांचे चिरंजीव उत्पल पर्रिकर यांना उमेदवारी नाकारल्याने नवीन वाद सुरु झाला आहे. यामुळे भाजपवर विरोधकांनी चांगलाच निशाणा साधला आहे. आप चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी उत्पल यांना ऑफर दिली आहे. त्याच पाठोपाठ आता या वादात सेनेने उडी टाकली असून शिवसेनेकडून देखील उत्पल यांना ऑफर देण्यात आली असल्याचं सुत्रांनी सांगितलं आहे.

याबद्दल अरविंद केजरीवाल यांनी ट्वीट केलं आहे. आपल्या ट्वीटमध्ये केजरीवाल म्हणतात, गोव्यातल्या लोकांना फार वाईट वाटत असेल की भाजपाने आता आपलं यूज अँड थ्रो धोरण पर्रिकर परिवारासोबतही वापरलं आहे. मी मनोहर पर्रिकर यांचा कायम आदर केला. उत्पलजी आम आदमी पक्षात सामील होण्यास आणि आपच्या तिकीटावर निवडणूक लढवण्यास तुमचं स्वागत असेल.

संजय राऊतांकडून उत्पल पर्रिकर यांना ऑफर-

मनोहर पर्रीकर यांच्या मुलाने अपक्ष म्हणून निवडणूक लढवली तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ, असे शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी म्हटले आहे. काँग्रेससोबत युती बाबत ते म्हणाले की, काँग्रेस तयार नाही. स्वबळावर पूर्ण बहुमत मिळेल, असे काँग्रेसला वाटते. शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती झाली असून आम्ही गोव्यात एकत्र निवडणूक लढणार आहोत.

Share