टाळी एका हाताने वाजत नाही, अजित पवारांचा फडणवीसांना टोला

पुणेः  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकार बदल्यांमध्ये महाघोटाळा करत असल्याचा आरोप केला होता.  या प्रकरणी मुंबई पोलिसांनी काल फडणवीस यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन दोन तास चौकशी केली. या सर्वप्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ऐकमेकांना संपवण्यासाठी आपल्या हातातील यंत्रणांचा उपयोग केला जतोय. परंतु, टाळी एका हाताने वाजत नसून दोन्ही बाजूंकडून चुकत असल्याचे मत अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.

अजित पवार म्हणाले की, राजकारणात एकमेकांचा राग केला नाही पाहिजे. एकमेकांना संपविण्यासाठी आपल्या हातातील यंत्रणांचा उपयोग केला जातोय. हे चुकीचे आहे. आपण ज्यांच्याबद्दल बोलतोय त्यांच्याबद्दल बोलण्याची आपली योग्यता आहे का याचाही विचार केला जात नाही. टाळी एका हाताने वाजत नाही. दोन्ही बाजूकडून चुकतंय असे माझे मत आहे, असे पवार म्हणाले.

आम्ही ओबीसी आरक्षणासाठी आयोग निर्माण केलाय. तो निर्णय न्यायालयात टिकेल का माहित नाही. पण या चार पाच महिन्यात या आयोगाने इमपीरिकल डेटा गोळा करावा. लोक विचारतायत की निवडणूका कधी होणार. निवडणूका दोन- तीन- चार महिने पुढे गेल्यात. मध्यंतरी अफवा उठली की दोनचा प्रभाग होणार. पण आगामी महापालिका निवडणुकांमधे तिनचाच प्रभाग असेल, असे पवार पुण्याती एका कार्याक्रमात म्हणाले.

Share