भाजप नेते प्रविण दरेकर यांना कोरोनाची लागण

मुंबई  : राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. स्वत: दरेकर यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक मंत्री, आमदार, खासदार नेतेमंडळी कोरोनाच्या विळख्यात अडकताना दिसत आहेत. राज्यातील १३ मंत्री, ४ खासदार तसेच ७० आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे. अशी माहिती राज्याचे मदत व पूर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. राज्यात अधिक प्रमाणात नेत्यांना कोरोनाची लागण झाली असल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान प्रविण दरेकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं की, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी आयसोलेशनमध्ये आहे. कृपया, माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी योग्य ती काळजी घ्यावी, थोडी जरी लक्षणे दिसत असल्यास तत्काळ कोरोना चाचणी करून घ्यावी. असे आवाहनही दरेकरांनी केले आहे.

यापुर्वी अनेक नेत्यांना कोरोनाची लागण
कालच राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खा. राजन विचारे, अरविंद सावंत, आ.प्रताप सरनाईक, यांना देखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. तर दुसरीकडे लातूर ग्रामीणचे आमदार. धिरज देशमुख, रोहित पवार, अतूल भातखळर यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

Share