शिवरायांच्या अवमान करणाऱ्यांविरोधात सर्वांनी एकत्र या – संजय राऊत

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारंवार अवमान केला जातोय.त्याविरोधात सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. छत्रपती संभाजी आणि खासदार उदयनराजे भोसले यांनीही या अवमाना विरोधात एकत्र यावं, असं आवाहन राऊतांनी केलं आहे.

संजय राऊत म्हणाले की, संभाजीराजे छत्रपती किंवा उदयनराजे यांची भावना ही महाराष्ट्राची भावना आहे. महाविकास आघाडीने सातत्याने या विषयावर आवाज उठवायचं काम चालू ठेवलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्याबाबत एक अल्टिमेटम दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा भाजपाकडून ज्या पद्धतीने अपमान केला जात आहे, कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्रावर हल्ले करत आहेत, या सगळ्याच्या विरोधात आपण एकत्र यायला हवं. मला वाटतं की लवकरच त्याबाबत कठोर पावलं उचलण्याबाबत निर्णय होईल, असं संजय राऊत यावेळी म्हणाले आहेत.

Share