‘जिलेबी कितीही आडवळणी असो..’ अमृता फडणवीसांनी देवेंद्रजींना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त पत्नी अमृता फडणवीस यांनी खास शुभेच्छा दिल्या आहेत. ”जिलेबी कितीही आडवळणी असो, तिची चव कायम गोडच असते, असं अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे.

अमृता फडणवीस यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, जिलेबी कितीही आडवळणी असो, तिची चव कायम गोडच असते. अगदी त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी कितीही आडवळणे आली तरी, अडथळ्यांची शर्यत पार करीत, त्यातून सुखद वाट सातत्याने शोधत कायम विकासाचा गोडवा पसरविणारे देवेंद्र फडणवीसजी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! आशा आशयाचे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले आहे.

दरम्यान, नुकतेच राज्यात सत्तांतर झाले. या सत्तांतराने एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्त झाले. विशेष म्हणजे, देवेंद्र फडणवीस यांच्या आजवरच्या राजकीय प्रवासात अमृता यांनी त्यांना तितकीच मोलाची साथ दिली आहे.

Share