Andheri By-Election : राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..

मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी अखेर माघार घेतली आहे. भाजपच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. भाजपाच्या या निर्णयानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना पत्रं लिहिलं असून त्यांनी फडणवीस आणि भाजपचे आभार मानले आहेत.

काय म्हटलं आहे राज ठाकरेंनी? 

श्री. देवेंद्र फडणवीस

उप-मुख्यमंत्री

महाराष्ट्र राज्य

प्रिय मित्र देवेंद्रजी,

सस्नेह जय महाराष्ट्र !

काल मी केलेल्या विनंतीला मान देऊन आपण अंधेरी (पूर्व) च्या पोट-निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतलात ह्याबद्दल आपले, आपल्या सहकाऱ्यांचे आणि पक्षातील वरिष्ठ नेतेमंडळींचे शतश: आभार. चांगली, सकारात्मक राजकीय संस्कृती ही सुदृढ समाजासाठी आवश्यक असते. अशी राजकीय संस्कृती असावी, वाढावी आणि राजकीय मंचावर आपापले मुद्दे घेऊन राजकीय पक्षांनी निकोप स्पर्धा करावी असा प्रयत्न महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही कायम करत असतो. त्याला आज तुम्ही प्रतिसाद दिलात ह्याबद्दल तुम्हा सर्वांचे पुनःश्च आभार..

आपला मित्र,

राज ठाकरे

Share