Andheri By-Poll: भाजपला उशीरा सुचलेले शहाणपण; राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकमध्ये सुरु असलेल्या आखाड्यातून अखेर भाजपने माघार घेतली आहे. हा निर्णय म्हणजे खरतर भाजपला उशीरा सुचलेले शहाणपण आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

राज्यात गेले काही दिवस राजकीय नाट्य सुरू होते. ऋतुजा लटकेंचा राजीनामा मंजूर न करणे, त्यांना नाईलाजाने न्यायालयात जाणे, त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप करणे, हे अत्यंत क्लेशदायक असल्याचं जयंत पाटील यावेळी बोलताना म्हणालेत. अंधेरी पोटनिवडणुकीसाठीच शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह आणि नाव गोठवण्यात आलं. शरद पवारांनी केलेल्या आवाहनानंतर भाजपाला उशीरा सुचलेले शहाणपण आहे. अन्यथा भाजपाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले असते, असं म्हणत जयंत पाटील  यांनी भाजपला टोला लगावला आहे.

दरम्यान,भाजपाने निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर माजी महापौर किशोर पेडणेकरांनी भाष्य केलं आहे. भाजपाने काळजावर दगड ठेवून हा निर्णय घेतला आहे. भाजपाने आडमुठेपणा केला. आजच पत्र का दिलं? एक महिनाआधी का दिलं नाही? हा संपूर्ण वाद टाळता आला असता. ऋतुजा लटकेंना मानसिक त्रास झाला, तो कसा भरुन काढणार?,” असा सवालही पेडणेकर यांनी उपस्थित केला आहे.

Share