Andheri By-Poll: अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपची माघार

नागपुर : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतन भाजपने माघार घेतली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतची घोषणा केली. भाजप उमेदवार मुरजी पटेल हे अपक्ष म्हणून देखील लढणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भाजपचे महाराष्ट्र प्रभारी सी.टी. रवि आणि मुंबईचे भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्यात बैठक झाली. या बैठकीनंतर भाजपने उमेदवारी मागे घेतल्याचा निर्णय जाहीर केला आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा अर्ज परत घेत आहे. लटके या निवडून याव्या यासाठी अर्ज परत घेत आहोत, असे भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी सांगितले.

Share