अनिल देशमुखांना दिलासा नाहीच! सीबीआय कोर्टाने जामीन नाकारला

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज सीबीआय कोर्टाने फेटाळला आहे. अनिल देशमुख यांचे जवळचे सहकारी कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांचाही जमीन अर्ज फेटळण्यात आला आहे. यामुळे अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर ईडीने देशमुखांना अटक केली होती. त्यानंतर सीबीआयनेही कारागृहात जाऊन देशमुखांची गैरव्यवहाराप्रकरणी चौकशी केली होती.

सीबीआयने देशमुख आणि त्यांचे कथित सहकारी स्वीय सचिव संजीव पालांडे आणि स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे यांच्यावर आरोपपत्र दाखल केले असून बडतर्फ पोलीस अधिक्षक सचिन वाझेला माफीचा साक्षीदार कऱण्यात आले आहे. त्याप्रकऱणात देशमुख यांनी डिफॉल्ट जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने अद्याप देशमुखांना दिलासा दिलेला नाही.

Share