राजन साळवी यांना अँटी करप्शन ब्युरोची नोटीस

मुंबई : ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नोटीस बजावली आहे. राजन साळवी यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यासाठी ही नोटीस बजावली आहे. साळवी यांना ५ 5 डिसेंबरला रत्नागिरीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयात हजर राहण्यास या नोटीसीत सांगण्यात आले आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी आज पत्रकार परिषद घेत एसीबीकडून आलेल्या नोटिशीनंतर पत्रकार परिषद घेतली. आमदार साळवी यांनी म्हटले की, राजकीय उलथापालथीनंतर मी निष्ठावंत राहिलो. मी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नाही. त्यामुळेच मला अँटी करप्शन ब्युरोची नोटीस आली आहे. यंत्रणाचा वापर करत नोटीस दिल्या जात असल्याचा आरोप साळवी यांनी केला.

दरम्यान, ज्यांच्यावर बेहिशेबी मालमत्ताचा आरोप ते भाजपमध्ये जात आहेत. मलादेखील तुम्हाला तुरुंगात डांबणार अशा धमक्या देण्यात आल्या असल्याचा दावा साळवी यांनी केला. आपण एसीबीच्या नोटिशीला घाबरत नसून चौकशीला सामोरे जाणार असल्याचेही त्यांनी म्हटले. नोटीस पाठवण्याइतके माझ्याकडे कोणते घबाड आहे, हाच प्रश्न मला पडला असल्याचेही साळवी यांनी म्हटले.

Share