लठ्ठपणा एक आजार असून यामुळे केवळ पर्सनॅलिटी खराब होते नाही तर हा इतर आजारांनाही आमंत्रण देतो. लठ्ठपणा वाढल्यास हाय ब्लडप्रेशर, कंबरदुखी, हृदयाचे आजार, गुडघेदुखी यासारखे आजार होण्याचा धोका वाढतो. यामुळे वजन कमी करण्यासाठी लोक डायटिंग करतात किंवा तास न् तास जिममध्ये घाम गाळतात परंतु तरीही वजन कमी होत नाही. कारण त्यांचा डाएट चार्ट योग्य नसतो. आहाराकडे योग्य लक्ष आणि थोडासा व्यायाम केल्याने वजन लवकर कमी करणे शक्य आहे. काही छोटे-छोटे घरगुती उपायांनी लठ्ठपणा दुर होऊ शकतो
- पत्ता कोबी सगळ्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होते. दररोज एक तरी पत्ता कोबीचे ज्युस सेवन करावे. कारण पत्ता कोबीमध्ये शरीरातीस वाढती चरबी कमी करण्याचे गुण असतात. त्यामुळे शरीरातील मेटाबॉलिज्म योग्य राहते.
- गव्हाच्या पिठाची पोळी बनवली जाते. मात्र, फक्त गव्हाची पोळी खाण्यापेक्षा गव्हामध्ये सोयाबीन आणि हरभरे एकत्र असलेले मिश्रित पिठाची पोळी खाणे फायदेशीर ठरते.
- साखर, बटाटा आणि तांदूळ यामध्ये जास्त प्रमाणात कार्बोहायेड्रेट जास्त प्रमाणात असते त्यामुळे हे पदार्थ कमीप्रमाणात खाणे कधीही योग्य आहे. हे पदार्थ न खाल्याने वजन कमी होऊ शकतो.
- पवईचे सेवन हे नियमीत खाले पाहीजे. पपईच्या सेवनामुळे कंबरेची अतिरिक्त चरबी कमी होते.
- दररोज दह्याचे सेवन केल्यानी अतिरिक्त चरबी कमी होते. तसेच प्रत्येक दिवशी सकाळी रिक्याम्या पोठी एक ग्लास भर घरात तयार केलेले ताक प्यावे. त्यामध्ये थोडेसे काळे मीठ आणि हिंग-जीरा पावडर टाकून ते पियावे. त्यामुळे वजन कमी होते.
- पहाटे रिकाम्या पोटी गरम पाणी पिणे फायदेशीर ठरते. यामुळे कॅलरीज कमी होतील. तसेच गरम पाण्यात लिंबू आणि मध टाकून पियाल्याने वजन कमी करण्यास जास्त फायदेशीर ठरते.
- रात्री उशीरा जेवणे हे पोटातील चरबी वाढवण्याचे प्रमुख कारण आहे. झोपण्याच्या २ तास अगोदर जेवण केले पाहीजे. तसेच लाईट आहार करणे गरजेचे आहे. त्यानंतर शतपावली करणे फायदेशीर ठरू शकते.
- गाजऱ्याचे भरपून सेवन केल्यामुळे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असल्याचे आधुनिक विज्ञानांनी मान्य केले आहे.
- आवळा आणि हळद हे पदार्थ बारीक चूर्ण तयार करा आणि ताकामध्ये टाकून ते सेवन केल्याने चरबी कमी होण्यास मदत होते.
- शरीरातील लठ्ठपणा वेगाने घटवण्यासाठी ओमेगा ३ फॅट्सचा आहारात समावेश करा. अक्रोड, बदाम आणि फ्लाक्स सीड्सचा अंतर्भाव तुमच्या जेवणात करा.
- ओट्स, बाजरी, ज्वारी, नाचणी, गहू, सॅलड, भाज्या आणि फळे यांसारखे फायबर असलेले कॉम्प्लेक्स काबरेहायड्रेट्स खाणे वजन घटवण्याची गुरुकिल्ली आहे.
- सॅलड किंवा सूप, यांच्यासोबत मासे, चिकन, मलईरहित पनीर यांसारख्या प्रोटिनसमृद्ध पदार्थाचा समावेश करा. यामुळे लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते.