कर्नाटकात हिजाब वाद चिघळला ; शिगोमा जिल्ह्यात कलम १४४ लागू

कर्नाटक- कर्नाटकात हिजाब घालण्यावरूनचा वाद चांगलाच चिघळला आहे. याप्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. दरम्यान भगव्या ध्वजाची जागा तिरंग्याने घेतली असून याचा एक व्हिडिओ  समोर आला आहे, ज्यामध्ये एक विद्यार्थी ध्वजाच्या खांबावर चढताना दिसत आहे. त्यांच्या हातात भगवा ध्वज आहे. खाली  इतर विद्यार्थी आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होतो आहे.  हा व्हिडिओ शिगोमा जिल्ह्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे.  या गावात सकाळच्या सुमारास दगडफेक देखील झाल्याच सांगण्यात येत आहे. त्यामुळे शिमोगा जिल्ह्यात महाविद्यालय , शाळा यांना सुटी देत कलम १४४ लागू करून परिस्थिती हाताळण्यात यश आले आहे.

दरम्यान उच्च न्यायालयात सुनावणी सुरु होण्यापुर्वी एका महाविद्यालयात निदर्शने झाली. काही विद्यार्थी भगवे स्कार्फ घालून हिजाब घातलेल्या मुलींनविरोधात घोषणा देताना देखील दिसले . त्यामुळे उच्च न्यायालय काय निर्णय देईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

मुख्यमंत्र्यांचे शांतता राखण्याचे आवाहन-
प्रकरण वाढत असताना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे वक्तव्य समोर आले आहे, त्यांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. हे प्रकरण आज हायकोर्टात मांडणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे हा वाद इथिचे थांबवा आणि मुलांना शिक्षणापासून दूर होवू देवू नका असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. मात्र, जोपर्यंत उच्च न्यायालयाचा निर्णय येत नाही तोपर्यंत नवीन समान कायद्याचे काटेकोरपणे पालन करावे, असे ते म्हणाले होते.

पाच विद्यार्थिनींच्या याचिकेवर सुनावणी-
कर्नाटकातील उडुपी येथील हिजाब वाद प्रकरणी आज उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. पाच मुलींनी दाखल केलेल्या याचिकेवर ही सुनावणी होणार आहे. वास्तविक, या विद्यार्थिनींच्या वतीने नवीन गणवेश कायद्याला विरोध करणारी याचिका दाखल करण्यात आली होती. आता नवीन नियमानुसार कॉलेजांमध्ये हिजाब घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे. १ जानेवारी रोजी, सहा मुस्लिम विद्यार्थिनींना उडुपी येथील सरकारी प्री-युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये वर्गात जाण्यास मज्जाव करण्यात आला, या सर्व मुलींनी हिजाब परिधान केला होता. कॉलेज व्यवस्थापनाने बंदीमागे नवीन समान कायद्याचे कारण सांगितले. ही समस्या आता उडुपीमधील इतर सरकारी महाविद्यालयांमध्येही पसरली आहे. कुंदापुरा महाविद्यालयातील २८ मुस्लीम विद्यार्थिनींना हिजाब परिधान करून वर्गात जाण्याची परवानगी नव्हती. तेव्हापासून अनेक विद्यार्थिनी हिजाबवरील बंदीला विरोध करत आहेत.

कर्नाटकचे शिक्षण मंत्री बीसी नागेश- 
गणवेशाचे पालन न करणाऱ्या विद्यार्थिनींना इतर पर्याय शोधण्याचे स्वातंत्र्य आहे. जसे सैन्यात नियमांचे पालन केले जाते, तसेच त्यांनी महाविद्यालयात आणि शाळेत केले पाहिजे.  ज्यांना ते पाळायचे नाही त्यांच्यासाठी पर्याय खुले आहेत.” राजकीय पक्षांच्या हातातील ‘शस्त्र’ बनू नका, असे आवाहन शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना केले आहे.

Share