किरीट आणि निल सोमय्यांना अटक करा संजय राऊतांची मागणी

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर सडकून टीका केली आहे. भाजपचे माजी खा. किरीट सोमय्या आणि त्यांचे नगरसेवक पुत्र निल सोमय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. यावेळी बोलताना ईडीने किरीट सोमय्या यांना अटक करावी अशी मागणी, संजय राऊत यांनी केली आहे.

खासदार संजय राऊत म्हणाले की, पीएमसी बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी राकेश वाधवान याला ब्लॅकमेल केलं आणि त्याच्याकडून कोट्यवधीची जमीन घेतली. त्यांनी एक जमीन सात कोटी रुपयांना आणि वसई येथील ४००कोटी रुपयांची जमीन चार कोटी रुपयाला घेतली आहे. त्या जागेवरील कंपनीचे डायरेक्टर नील सोमय्या आहे. निकॉन फेज एक आणि निकॉन फेज दोन हा हजारो कोटींचा प्रकल्प उभारला आहे. त्याला पर्यावरण विभागाचा परवाना नाही. या प्रकरणी कंपनीच्या सर्व परवानग्या रद्द करा , असं मी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना सांगतो या प्रकरणी त्यांनी लक्ष घालावे . तसेच पीएमसी बँकेच्या घोटाळ्यातून मिळालेल्या पैशातून अनेक ठिकाणी जमिनी घेतल्या आहेत. या बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी किरीट सोमय्या आणि निल सोमय्या यांना अटक करा अशी मागणी खा. संजय राऊत यांनी यावेळी केली आहे.

 

संजय राऊतांचा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना फोन 

संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत आरोप करताना म्हटले, ‘ईडीचे अधिकारी माझे नातेवाईक, मित्र, मुलगा, मुलगी यांना फोन करून धमकावतात. नातेवाईकांवर, मित्रांवर छापे टाकतात. अरे लहान मुलांनाही धमकावतात. तुमच्या वडिलांना उद्या ईडीच्या चौकशीसाठी जावे लागणार. अटक होणार म्हणून. ज्या दिवशी माझ्या नातेवाईकांच्या घरावर ईडीचे छापे सुरु होते, त्याच दिवशी रात्री मी अमित शाह यांना फोन केला होता. जे सुरु आहे, ते चांगलं नाही म्हटलं. तुमची माझ्याशी दुश्मनी आहे तर मला टॉर्चर करा. पण तुम्ही माझ्या जवळच्या लोकांना टार्गेट करताय हे चुकीचं आहे. ” असेही राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत.

Share