नुसताच गवगवा ना मुद्दे ना पुरावे उपाध्येंचा राऊतांना टोला! 

मुंबई- शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नुकतच मुंबईतील शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत भाजपावर चांगलच हल्ला बोल केला. किरीट सोमय्या , देवेंद्र फडणवीस आणि मोहित कंबोज यांच्यावर निशाणा साधत भाजपवर आरोप केले. त्यांच्या या पत्रकार परिषदेवर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत राऊतांना टोला लगावला आहे.

उपाध्ये यांनी ट्विटमध्ये म्हंटल आहे की, ना पुरावे ना प्रश्न उत्तरे फक्त पत्रकार परिषदेचा गवगवा केला. तुमच्याकडे मुद्देच नव्हते त्यामुळे मुंबई बाहेरून आणि नाशिकवरून शिवसैनिक जमवण्याची वेळ तुमच्यावर कशी आली ? खरोखर पुरावे तुमच्याकडे नव्हते . पत्रकार परिषद झाल्यानंतर प्रश्नोत्तरांना नकार दिला . फक्त नेहमी प्रमाणे गोंधळच केला, अशी खोचक टिका केशव उपाध्ये यांनी राऊतांच्या पत्रकार परिषदेवर केली आहे.

महाराष्ट्र गांडूची अवलाद नाही- संजय राऊत 

महाराष्ट्रावर आणि आपल्यावर जे आक्रमण सुरु आहे, त्या आक्रमणाविरुद्ध कुणीतरी रणशिंग फुकायला हवं होतं, ते आज इथून आपण फुकंतोय. बाळासाहेबांनी आपल्याला मंत्र दिलाय, ते नेहमी म्हणायचे, तू काही पाप केलं नसशील, तुझं मन साफ असेल, काही गुन्हा केला नसेल, तर कुणाच्या बापाला घाबरु नका. उद्धव याच मंत्रावर शिवसेना पुढे घेऊन जात आहेत. आज आम्हाला संदेश द्यायचा आहे की, महाराष्ट्र गांडूची अवलाद नाही. मराठी माणूस बेईमान नाही. आणि तुम्ही कितीही नामर्दासाराखे वार केले. तरी शिवसेना घाबरणार नाही, अशा शब्दात राऊत यांनी भाजपवर घणाघाती हल्ला चढवला.

Share