संजय राऊतांच्या पिक्चरचा ट्रेलरच फ्लॉप दरेकरांची टिका

मुंबई- संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर भाजपकडून जोरदार टिका होत आहे. राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत . केंद्र सरकारकडून महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचे सातत्याने प्रयत्न केले जात आहे. यावर माध्यमांशी संवाद साधताना राज्याचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी खोचक शब्दात राऊतांवर निशाणा साधला आहे. राऊतांच्या चित्रपट ट्रेलरमध्येच फ्लाफ झालाय असं त्यांनी म्हंटल आहे.

यावर प्रवीण दरेकर पुढे म्हणाले की, जिकडे करायला पाहिजे तिकडे करायचं नाही . यांना फक्त इव्हेंट करायचे आहेत महाराष्ट्रात भावनिक वातावरण निर्माण करायच आहे. त्यांच्या आरोपात काडीमात्र तथ्य नाही . असं दरेकर यावेळी म्हणाले आहे. तसेच मोहित कंबोज यांच्यावर केलेले आरोप देखील फक्त आरोपापुरते आहेत त्यात कोणतीच सत्यता नाही. अशी दरेकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Share