मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर गणपती बाप्पाचे आगमन

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा‘ या शासकीय निवासस्थानी आज सकाळी गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या पत्नी सौ. लता शिंदे यांच्या हस्ते यावेळी पूजाआरती करण्यात आली. यावेळी मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदेस्नुषा सौ. वृषाली शिंदेनातू कु. रुद्रांश यांच्यासह कुटुंबातील सदस्यअधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्याच्या विकासाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी बळ देण्याबरोबरच राज्यातील जनतेला सुखी-समृद्धसमाधानी ठेवण्याचे साकडे मुख्यमंत्र्यांनी यावेळी गणरायाला घातले. गणेशोत्सवाच्या काळात सामाजिक सलोखा जपतानाच निर्भयमुक्त वातावरणातआनंद-जल्लोषात तसेच पर्यावरणपूरक वातावरणात हा गणेशोत्सव साजरा करावाअसे आवाहनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.

आज गणेशोत्सवाच्या निमित्ताने लाडक्या गणरायाचे स्वागत करतानामहाराष्ट्राच्या विकासाचा पुन:श्च श्रीगणेशा करण्याचा संकल्प करूया. त्यासाठी आपण सर्व एकजुटीने आणि कोणत्याही आव्हानाची तमा न बाळगता प्रयत्न करूयाअसेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Share