जोपर्यत भाऊ मुख्यमंत्री आहेत तोपर्यत ते कौतूक करणार नाहीत : पाटील

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्वात आधी गुजरातचे कौतुक केले. आता ते युपीचे कौतूक करत आहेत. महाराष्ट्र सोडून सर्व राज्यांचे कौतूक करण्यासाठी राज ठाकरे दौरे करतील. पण जोपर्यंत त्यांचे भाऊ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. तोपर्यत महाराष्ट्राचे कौतूक करायचे नाही. अशी खोचक टिका राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केली आहे.
महागाईचे मुळे केंद्रातच आहे
भारतात महागाई प्रचंड वाढलेली आहे. अशावेळी विविध विषयांकडे लक्ष वळविण्याचा प्रयत्न होत असल्याचेही जयंत पाटील म्हणाले. आपल्या शेजारी असलेल्या श्रीलंका आणि पाकिस्तानमध्ये देखील महागाई वाढलेली दिसते. मात्र आपल्याकडे केंद्र सरकार महागाईचे खापर राज्यांवर फोडून मोकळे होत आहे. महागाईचे मूळ केंद्रातच आहे, हे विसरुन चालणार नाही, असे जयंत पाटील म्हणाले.

तुम्ही राष्ट्रवादीबरोबर चर्चा का केली?

शिवसेना होती म्हणून विरोध करण्याचा प्रश्न नव्हता. मुळात चर्चा झालीच नाही तर विशेष करण्याचा प्रश्न येतो कुठून? आमची काँग्रेसबरोबर आघाडी होती. आमची आघाडी विरोधी पक्षाचे काम करत होती. त्यामुळे भाजपला आमच्याशी चर्चा करायची गरज का चाटली? असा उलट सर्व करत त्यांनी भाजपकडून सुरू असलेल्या युतीच्या चर्चेला उत्तर दिलं. आमच्याशी भाजपने चर्चा का केली? त्यातून शिवसेनेला बाजूला करा असे म्हणत असू तर या सगळ्या हवेतील गप्पा आहेत. तुम्ही सरोत असताना, तुमच्याबरोबर तुमचा मित्र पक्ष असताना तुम्ही राष्ट्रवादीबरोबर चर्चा का केली? हा प्रश्न माझ्यावतीने भाजपला विचारा, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला आहे.

Share