‘आपले नाही धड अन…’शेलारांचा सेनेला टोला

मुंबईः  देशातील पाच महत्त्वाच्या राज्यांचे निकाल जाहीर होण्यास सुरवात झाली आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि मणिपूर या पाचही राज्यांमध्ये चुरशीने लढल्या गेली आहे. पाचही राज्यांचे सर्व जागांचे कौल हाती आले आहेत. त्यानुसार गोवा आणि युपीत शिवसेनेचा पराभव झाल्यानंतर भाजपा नेते आशिष शेलार यांनी ट्वीट करत शिवसेनेला टोला लगावला आहे.

आशिष शेलार यांनी ट्विट मध्ये म्हटल आहे की,   “अरविंद केजरीवालांचा आता बहुतेक शिवसेना भवनात जंगी सत्कार होईल.. शिवाजी पार्कमध्ये हत्तीवरून युवराज साखर सुध्दा वाटतील… शेजाऱ्यांच्या घरात पाळणा हलला की, पेढे वाटपाचे कार्यक्रम करुन दाखवले जातात. आपले नाही धड अन शेजाऱ्यांचा कढ! ” असा टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे.

पुढे ते म्हणाले की,   “इसवीसन २०२४ साली दिल्लीच्या खुर्चीत बसणार, उत्तर प्रदेश, गोव्यात बघा आम्ही करुन दाखवतो, उत्तर प्रदेशात युवराजांची अती विराट सभा…झंझावाती दौरा…सगळ्या बुडबुड्यांचे निकाल लागले…अती प्रचंड मतांनी झंझावाती डिपॉझिट गुल…हारले..“एक मासो आणि खंडी भर रस्सो!”, असेही ते म्हणाले आहेत.

Share