या राज्यात शिवसेनेला नोटांपेक्षाही कमी मतदान !

गोवा- पाच राज्यांच्या निवडणूकांचे निकाल जाहिर होत आहेत. गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा दारुण पराभव झाला असून एकही जागा त्यांना राखता आलेली नाही. उलट नोटा या पर्यायाला शिवसेनेपेक्षा अधिक मत मिळाली आहेत. त्यामुळं शिवसेनेसाठी ही धक्कादायक बाब मानली जात आहे. निवडणूक आयोगानं आपल्या वेबसाईटवर याबाबत अधिकृत आकडेवारी जाहीर केली आहे.

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, गोव्यात शिवसेनेला एकूण मतदान ०.१९ टक्के इतके झाले आहे. यामध्ये १,५२२ इतकी एकूण मतं शिवसेनेला मिळाली आहेत. तर कुठलाही उमेदवार नकारण्याचा पर्यायाला म्हणजेच नोटाला १.१३ टक्के मतं मिळाली आहेत, यामध्ये एकूण ९,०९६ मतं आहे. हि आकडेवारी पाहता गोव्यात सेनेला पसंती मिळालेली नाही हे स्पष्ट दिसून आलं आहे.

दरम्यान, गोव्यात महाराष्ट्राप्रमाणं शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवावी अशी भूमिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मांडली होती. मात्र, काँग्रेसने याला विरोध दर्शवला होता. याचाही फटका शिवसेनेला बसला आहे. परंतू  काँग्रेसही  पिछाडीवर असून भाजपने चांगलीच आघाडी घेतली आहे.

Share