मुंबई- राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा केंद्र सरकारकडून प्रयत्न केला जात असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. सध्या त्यांची वेळ आहे आणि वेळ बदलते आणि ते काही अमरपट्टा घेवून आलेले नाहीत असं म्हणत पटोले यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे.
भाजप कडून महाविकास आघाडी सरकार पडण्याचा दबाव टाकत आहे, हा लोकशाहीला घातक आहे. आम्ही भाजपची सर्व काळी कृत्ये जनता समोर घेऊन जाणार. भाजपला महाराष्ट्रची जनता त्याची जागा दाखवेल. pic.twitter.com/3vOrbF0jfm
— Nana Patole (@NANA_PATOLE) February 16, 2022
पटोले म्हणाले की, महाविकास आघाडी पाडण्यासाठी अनेकदा प्रलोभन आणि दबावतंत्राचा वापर केला जात आहे, हा खऱ्या अर्थाने मोठा आक्षेप आहे. कोणाच्या इमारती किती आहेत? कोणी काय केलं? हे सगळे भाजपावाले दूधाने धुतलेले आहेत, असं तर नाही. पण खरा आक्षेप जो आहे की सरकार पाडण्यासाठी सातत्याने दबाव आणला जातोय, हा जो आक्षेप आहे हाच लोकाशाहीसाठी घातक आहे. म्हणून या आक्षेपाकडे जास्त जोर देण्याची गरज आहे.