मविआवर दबाव टाकून सरकार पाडण्याचा प्रयत्न -नाना पटोले

मुंबई- राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा केंद्र सरकारकडून प्रयत्न केला जात असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. सध्या त्यांची वेळ आहे आणि वेळ बदलते आणि ते काही अमरपट्टा घेवून आलेले नाहीत असं म्हणत पटोले यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे.

 

पटोले म्हणाले की, महाविकास आघाडी पाडण्यासाठी अनेकदा प्रलोभन आणि दबावतंत्राचा वापर केला जात आहे, हा खऱ्या अर्थाने मोठा आक्षेप आहे. कोणाच्या इमारती किती आहेत? कोणी काय केलं? हे सगळे भाजपावाले दूधाने धुतलेले आहेत, असं तर नाही. पण खरा आक्षेप जो आहे की सरकार पाडण्यासाठी सातत्याने दबाव आणला जातोय, हा जो आक्षेप आहे हाच लोकाशाहीसाठी घातक आहे. म्हणून या आक्षेपाकडे जास्त जोर देण्याची गरज आहे.

पुढे ते म्हणाले की, आज त्यांचा वेळ आहे पण वेळ बदलेल ना, हे काही अमरपट्टा घेऊन आलेले नाहीत. त्यामुळे त्या विषयावर आज आम्ही काँग्रेसकडून कुठलीही भूमिका मांडणार नाही. परंतु संजय राऊत यांनी जी भूमिका मांडली आहे त्यामध्ये निश्चितपणे आम्ही जनतेसमोर आम्ही जाऊ. दबावतंत्र वापरून खोटे आरोप लावून महाविकासआघाडी सरकार पाडायचा केंद्र सरकाचा जो प्रयत्न आहे, या विषयाकडे आम्ही जनतेचं लक्ष वेधू. अस नाना पटोले माणाले  आहे.

 

Share