खराब औरंगाबाद- अजिंठा रस्त्यामुळे पर्यटन व्यवसाय धोक्यात

औरंगाबाद-जळगाव रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम रखडल्याने जागतिक वारसा स्थळ अजिंठा लेणीचे पर्यटन संकटात सापडले आहे. जवळपास ९९ किमीचे अंतर पार करण्यासाठी खाच खळग्याच्या रस्त्यावर असंख्य अडथळे पार करावे लागतात. या खराब रस्त्यामुळे हे अंतर पार करण्यासाठी जवळपास तीन ते साडेतीन जास्त लागतात. त्यामुळे टूर ऑपरेटर्सनी प्रेक्षणीय स्थळांच्या यादीतून चक्क अजिंठा वगळले आहे. पर्यटकांची संख्या लाखांवरून काही हजारांवर आली आहे. गेल्या ४ वर्षांत २८ ते ३० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अहवालाप्रमाणे, औरंगाबाद-जळगाव रस्त्यावर रोज १० हजार वाहने धावतात. याच रस्त्यावरून देश-विदेशातील पर्यटक अजिंठा लेणी बघायला जातात. रस्त्याची दुरवस्था झाल्याने तो दुपदरी करण्याचा निर्णय नोव्हेंबर २०१५ मध्ये झाला. केंद्राच्या योजनेतून राज्य शासनाच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या देखरेखीत काम देण्यात आले. तेलंगणच्या ऋत्विक प्रोजेक्ट्स प्रा.लिमिटेडने टेंडर मिळवून काम सुरू केले. २०१६ मध्ये रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी उद्घाटनाला आले. त्यांनी दोनऐवजी चारपदरी रस्त्याची सूचना केली. मंजूर बजेटमध्ये राष्ट्रीय महामार्गाच्या निकषातील ४८ मीटरचा चारपदरी रस्ता शक्य नव्हता. यामुळे विद्यमान २३ मीटरचा रस्ता ३० मीटरमध्येच चौपदरी करण्याचे ठरले.

अजिंठा येथील एका दुकानाचे दिवसाकाठी सरासरी २ हजार रुपयांप्रमाणे ७८ दुकानांत १ लाख ५६,००० रुपयांची उलाढाल होते.  डोलीवाल्यानाही प्रत्येकी ७००-८०० रुपये दिवसाला मिळायचे यांची उलाढाल ही २२,४०० रुपयांची होती, हॉकर्सची संख्या १५० असून प्रत्येकाची दिवसाची ५०० ते ७०० प्रमाणे दिवसाची ७५,००० रुपयांची उलाढाल होते. अजिंठा-फर्दापूर पाॅइंटपर्यंत ६० टॅक्सी चालक प्रत्येकी १००० रुपयांप्रमाणे ६० हजार रुपयांची कमाई करतात.सर्व मिळून दिवसाकाठी ३ ते ३.२५ लाख रुपये, महिन्याकाठी ९० लाख तर वर्षाकाठी १० ते ११ कोटी रुपयांची उलाढाल होते.

पर्यटकांचा त्रास वाचवण्यासाठी टूर ऑपरेटर्सनी अजिंठा प्रेक्षणीय स्थळांच्या यादीतून वगळल्याची माहिती टुरिझम प्रमोशन गिल्डचे अध्यक्ष जसवंतसिंग राजपूत यांनी दिली. याबाबत सरकारकडे पाठपुरावा करत असल्याचे त्यांनी सांगितले.

औरंगाबादपासून रस्अत्यांच्या डथळ्यांची शर्यत आहे. पुढे अजिंठा घाटाचा ४.३ किमीचा रस्ता गुळगुळीत असला तरी अनेक ठिकाणी कठडे नसल्याने अपघातांचा धोका आहे.

Share