स्मार्ट सीटी अभियानाअंतर्गत हाती घेतलेल्या कोट्यावधी रुपयांच्या कामाच्या निविदा औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनने गेल्या १५ दिवसात मार्गी लावल्या आहेत. त्यामुळे स्मार्ट सिटी ड्व्हलपमेंट यादीत औरंगाबाद शहर आता १५व्या स्थानी आहे. ४५ व्या स्थावरुन स्मार्ट सिटीची प्रगती झाली आहे.
केंद्र शाशनाच्या स्मार्ट सिटी अभियानाला जुन २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. असे असेल तर कामांच्या निविदा प्रक्रिया पुर्ण करुन कार्यारंभ आदेश देण्यासाठी ३१ मार्च ची मुदत दाण्यात आली होती. त्यानुसार महापालीकेने २४० कोटी रुपयांचे कर्ज घेउन स्वहिस्सा भरला. त्यामुळे औॅरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हपमेंट कार्पोरेशन ३१ मार्चपर्यंत पंधरा दिवसात १९ कामाच्या ६३५ कोटी रुपयांच्या निविदा काढुन त्या अंतीम केल्या. सध्या पात्र निविदाधारकांनी बॅंकगॅरंटी भरल्यावर त्यांना येत्या आठ- दहा दिवसात वर्क ऑर्डर दिली डाणार आहे . या सर्व कामांमुळे औरंगाबाद स्मार्ट सिटीचे रॅंकिंग सुधारले असल्याचे मुख्य कार्यकारी अधीकारी आस्तिककुमार पांडेय यांनी दिली.