औरंगाबाद ते पुणे फक्त सव्वा तासात ; नितीन गडकरी यांची मोठी घोषणा

आता औरंगाबादहून पुण्याला सव्वा तासात पोहचता येण शक्य होणार आहे. औरंगाबाद ते पुणे नव्या महामार्गाची घोषणा नितीन गडकरी यांनी काल केली. दहा हजार कोटी रुपये खर्चून हा महामार्ग तयार केला जाणार आहे. या महामार्गाच काम पूर्ण झाल्यानंतर केवळ सव्वा तासात पुण्याला पोहचता येईल. रविवारी चौपदरीकरण झालेल्या सोलापूर – धुळेसह अन्य काही महामार्गाचे लोकार्पण आणि भूमिपूजन झाले याप्रसंगी बोलत असताना गडकरी म्हणाले.

औरंगाबाद पुणे या महामार्गामुळे औरंगाबादच्या वाहतुकीचा प्रश्न सुटणार आहे.आगामी काळात जिल्हयात २५ हजार कोटीच्या रस्त्याच काम सुरू होणार आहे.२०२४ पर्यंत मराठवाड्यातील सगळे रस्ते अमेरिकेतील रस्त्यांच्या दर्ज्याचे होतील. साखर करखान्यांमुळे इथेनॉल निर्मिती वाढत आहे. या इथेनॉलवरचालणाऱ्या उद्योजकांना भेटण्याची सूचना ही त्यांनी याप्रसंगी केली. इथेनॉलवर चालणाऱ्या दुचाकी चारचाकी वाहने आणि धरणात उतरणारे विमान अश्या बऱ्याच गोष्टींचा उल्लेख त्यांनी भाषणात केला. त्याचबरोबर रोप वे, इलेक्ट्रिक कार आणि बस साठी प्रस्ताव पाठवण्याच आव्हान ही नितीन गडकरी यांनी केल.

 

Share