फडणवीसांच्या श्रेयवादाच्या टीकेला आव्हाडांचे प्रत्युत्तर

ठाणेः विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी कोणाचे लग्न झाले तरी त्याचे श्रेय घ्यायचे, कोणाला मुलगा झाला तरी त्याचे देखील श्रेय घ्यायचे अशी टिका महाविकास आघाडीवर केली होती. यावर आता राष्ट्रवदीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिल. फडणवीस यांच्यासारख्या प्रगल्भ माणसाने असे काहीतरी बोलावे हे अपेक्षित नसल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, देवेंद्र फडणवीस महाविकास आघाडीवर टीका करताना म्हणाले की, महाविकास आघाडीला प्रत्येक गोष्टीचे श्रेय घेण्याचे सवय आहे. कोणाचे लग्न झाले तरी श्रेय घे, कोणाला मुलगा झाला तरी श्रेय घे अशी टीका त्यांनी केली. मात्र मला वाटते फडणवीस यांच्यासारख्या प्रगल्भ माणसाने असे काहीतरी बोलावे हे अपेक्षित नाही. ठाण्यात मला कुठेही श्रेयवादाची लाढई दिसली नाही. कार्यकर्त्यांचा हूरूप वाढवण्यासाठी कधी -कधी बोलावे लागते असे म्हणत आव्हाड यांनी फडणवीसांना टोमणा लगावला आहे. हेसर्व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.

Share