आसुस आरओजी फाईव्ह एस आणि प्रो लाँच

देशात आसुसने त्यांचे आरओजी फाईव्ह एस आणि फाईव्ह एस प्रो लाँच केले आहेत. या फोन्स साठी स्नॅपड्रॅगन ८८८ प्लस एसओसी, ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप व ६५ वॉटचा फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला गेला आहे. फाईव्ह एस ८ जीबी रॅम, १२८जीबी स्टोरेज साठी बेस किंमत ४९९९९ रुपये आहे. तर १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजसाठी ५७९९९ रुपये रुपये मोजावे लागणार आहेत. फाईव्ह एस प्रो साठी ७९९९९ रुपये मोजावे लागतील.

 


या गेमिंग स्मार्टफोनची विक्री १८ फेब्रुवारी पासून फ्लिपकार्टवर सुरु झाली आहे. या फोन साठी ६.७८ इंची फुल एच डी प्लस अमोलेड ई ४ डिस्प्ले कॉर्निंग गोरील्ला ग्लास प्रोटेक्शन सह दिला गेला आहे. अँड्राईड ११ ओएस आहे. व्हिडीओ फोटो साठी ६४ एमपीचा प्रायमरी, १३एमपीचा अल्ट्रावाईड तर ५ एमपीचा मॅक्रो सेन्सर दिला गेला आहे. सेल्फी साठी २५ एमपीचा फ्रंट कॅमेरा आहे. गेमर्ससाठी अल्ट्रासोनिक सेन्सर, ग्रीपप्रेससह दिला गेला आहे. फ्रंट फायरिंग स्टीरीओ स्पीकर्स सह ६ हजार एमएएचची बॅटरी आहे. हे फोन फाईव्ह जी ला सपोर्ट करतात.

Share