मुंबई- पंतप्रधान मोदी यांनी काल केलेल्या वक्तव्यावरून महाराष्ट्रातलं राजकारण पुन्हा एकदा पेटलं आहे. मोदींच्या त्या वक्तव्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक पाहायला मिळतेय. महाराष्ट्र काँग्रेसने मजुरांना स्थलांतर करण्यासाठी भाग पाडलं, त्यासाठी मोफत तिकीटं त्यांना देण्यात आली, असा आरोपही नरेंद्र मोदींनी केला होता . राष्ट्रपतींच्या अभिभाषणेवर झालेल्या चर्चेला उत्तर देताना ते संसदेत बोलत होते. यानंतर आता महाराष्ट्र काँग्रेसह राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कराऱ्या शब्दात उत्तर देवू असं ट्विट करत मोदींच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.
निवडणुकीसाठी काहीपण ह्या विचारांच्या पंतप्रधान मोदी ह्यांनी त्या पदाच्या प्रतिष्टेचा विचार न करता महाराष्ट्रावर टीका केली
हि बदनामी महाराष्ट्र सहन करणार नाही
करार जवाब मिलेगा #महाराष्ट्रद्रोही_bjp— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 8, 2022
पंतप्रधानांच्या कालच्या भाषणात त्यांनी महाराष्ट्र काँग्रेसने कोरोना पसरवला असं वक्तव्य केलं आहे. यावर आता राजकारणात पुन्हा एकदा भाजप विरोधी राजकारण तापायला सुरुवात झाली . आव्हाडांनी देखील ट्विट करत म्हंटल आहे की, निवडणूकीसाठी काहीपण या विचाराने पंतप्रधान मोदींनी पदाच्या प्रतिष्ठेचा विचार न करता महाराष्ट्रावर टिका केली आहे. हि बदनामी महाराष्ट्र सहन करणार नाही, याचा करारा जवाब दिला जाईल असं ट्विट करत त्यांनी वक्तव्याचा निषेध नोंदवला आहे.