शिवाजी पार्कची स्मशानभूमी बनवू नका- प्रकाश आंबेडकर

मुंबई : भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनानंतर आता त्यांच्या स्मारकाचा वाद राज्यात पाहायला मिळत आहे. भाजप आमदार राम कदम आणि काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार झाले तिथे लता मंगेशकर यांचं स्मारक बनवावं अशी मागणी होत आहे. मात्र या मागणीला वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी विरोध दर्शवला आहे.

शिवाजी पार्क येथे लता मंगेशकर यांच्या स्मारकाबाबत प्रकाश आंबेडकर यांना विचारले असता ते म्हणाले की, या मागणीला माझा विरोध आहे. शिवाजी पार्क हे शिवाजी पार्कच राहायला हवे, त्याची स्मशानभूमी होऊ नये. शेजारी दुसरी चांगली मोठी स्मशानभूमी आहे. परंतु शिवाजी पार्क हे एकमेव मोठं ग्राऊंड आहे. ज्यावर मुलांना खेळता येतं. तिथं शाळा, कॉलेज किंवा इतर मुलांच्या मॅचेस होतात. व्यक्तींचं स्मारक करायचे असेल तर इतर अनेक जागा आहेत, परंतु मुलांना खेळण्यासाठी असलेल्या मैदानांवर अतिक्रमण करावं असे मला वाटत नाही, असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.

Share